Aurangabad NCP Akshay Patil Banners Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad : 'भाजपमध्ये गेल्यावर ED ने कारवाई केल्याचं दाखवा अन् १० लाख जिंका'

यावरून भाजप आता राष्ट्रवादीला काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

डॉ. माधव सावरगावे

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना रविवारी रात्री ईडीने (ED) अटक केली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा केंद्रीय तपासयंत्रणांमार्फत भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच औरंगाबाद (Aurangabad) शहरात एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने बॅनर्स लावल्याने या चर्चेने अधिकच जोर धरला आहे. (Aurangabad Latest News)

भाजपमध्ये असलेल्या नेत्यांवर तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांवर 'ईडी'ची कारवाई झाल्याचं दाखवा आणि दहा लाख मिळवा, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद शहरातील अनेक भागात अशा स्वरुपाचे बॅनर्स लावले आहेत.

दरम्यान, सध्या राज्यात ईडीच्या कारवाया वाढल्याने या बॅनर्सचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावरून भाजप आता राष्ट्रवादीला काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यायालयाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने अगोदर ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, पण कोर्टाने तीन दिवसांची ईडी कोठडी दिली आहे.

रविवारी सकाळपासून ईडीने संजय राऊत यांच्या निवासस्थानी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर राऊतांना ताब्यात घेऊन त्यांची सलग १४ तास चौकशी करण्यातया चौकशीनंतर राऊत यांची रात्री १ च्या दरम्यान त्यांना अटक केली. सकाळी मेडिकल तपासणी करुन राऊत यांना कोर्टात आणले. सोमवारी कोर्टात सुनावणी झाली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT