Aurangabad Crime News SaamTV
महाराष्ट्र

Crime News: सातारा परिसरात महापालिका कर्मचाऱ्यास नागरिकांनी दोन तास ठेवलं डांबून

या प्रकारामुळं परिसरात एकच खळबळ उडाली.

साम न्यूज नेटवर्क

- अविनाश कानडजे

औरंगाबाद : औरंगाबाद (aurangabad) येथील सातारा परिसरातील दोन गटातील जमिनीच्या वाद असताना पडताळणीसाठी गेलेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यास दोन तास डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे या परिसरात (aurangabad latest marathi news) एकच खळबळ उडाली हाेती.

सातारा (Satara) पोलीस (Police) परिसरातील गट नंबर १४ आमिर कॉलनीतील नागरिकांनी नोटरी कृत खरेदी खताच्या मालकीहक्क नुसार अनधिकृत विकास नियमितीकरण करण्यासाठी संचिका दाखल केल्या होत्या. काही जणांनी नियमितीकरण करण्यात येऊ नये असा आक्षेप नोंदवला होता. याप्रकरणी जागेची पडताळणी करण्यासाठी गेलेले नगररचना विभागातील मनपा कर्मचारी अब्दुल कुर्रम कुरेशी यांना नागरिकांनी घेराव घालून चक्क २ तास खोलीत डांबून ठेवले.

त्यानंतर प्रभाग रचना विभागाचे उपसंचालक आणि उपअभियंता यांनी नागरिकांची समजूत काढून त्यांची सुटका केली. याप्रकरणी मनपाकडून सातारा पोलीस ठाण्यात तक्रार (complaint) देण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT