kolhapuri Chappal  Saam Tv
महाराष्ट्र

kolhapuri Chappal : ...अन् आरोपांच्या पिंजऱ्यात अडकलेली कोल्हापुरी चप्पल मुक्त झाली, जाणून घ्या गोष्ट एका खटल्याची!

कोल्हापुरी चप्पल म्हणजे नादखुळा. पण तीच कोल्हापुरी चप्पल एका प्रकरणात अडकली आणि एकाने तिला चक्क हत्यार ठरवले. शेवटी प्रकरण थेट हायकोर्टात दाखल झालं.

डॉ. माधव सावरगावे

kolhapuri Chappal Special News : जगात भारी कोल्हापुरी असं साता समुद्रापार बोललं जातं. त्यात कोल्हापुरी चप्पल म्हणजे नादखुळा. पण तीच कोल्हापुरी चप्पल एका प्रकरणात अडकली आणि एकाने तिला चक्क हत्यार ठरवले. शेवटी प्रकरण थेट हायकोर्टात दाखल झालं.

लोकल टू ग्लोबल असलेल्या कोल्हापूरी चप्पलेची क्रेझ जगात आहे. लहानथोराच्या पायात कर-कर वाजणारी कोल्हापुरी चप्पल मराठवाड्यात मात्र एका वेगळ्याच प्रकरणात अडकली. शेवटी तिला औरंगाबाद खंडपीठाने आरोपमुक्त केले.

त्याचं झालं असं, बीड (Beed) जिल्ह्यातल्या मस्साजोग इथं मंगेश देशमुख आणि त्यांची पत्नी श्रद्धा यांनी अनंत देशमुख यांना कोल्हापुरी चपलेने मारहाण केली. त्यानंतर अनंत देशमुख यांनी पोलिसात तक्रार दिली.

त्यावरून मारहाण करणाऱ्या मंगेश आणि श्रद्धा देशमुख यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल झाला. मात्र, कोल्हापुरी चपलेने गंभीर दुखापत कशी होईल, असा प्रश्न करीत आपल्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी मंगेश आणि श्रद्धा देशमुख यांनी औरंगाबाद (Aurangabad) हायकोर्ट गाठले.

अखेर कोल्हापूरी (Kolhapur) चपलेसोबत मंगेश देशमुख आणि श्रद्धा देशमुख आरोपमुक्त झाले. मात्र, हा खटला फिरला होता तो कोल्हापूरी चपलेवर. गावा खेड्यापासून ते शहरातल्या मोठमोठ्या इमारतीत कोल्हापुरीचा वावर कोल्हापुरीने पण यापूर्वी अनेकदा कोर्ट पाहिले पण कोर्टात तिच्यावर कधी चर्चा होईल असं तिला पण कधी वाटलं नसावं. आता थेट आरोपांच्या पिंजऱ्यात अडकलेली कोल्हापूरी मुक्त झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

Crime : आधीच बलात्कार झालेल्या १३ वर्षांच्या पीडितेवर वकिलानेच केला अत्याचार, संपूर्ण देश हादरवणारी घटना

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडाकेबाज कारवाई! प्रसिद्ध ब्लड बँकचा परवाना कायमचा रद्द

SCROLL FOR NEXT