aurangabad crime news
aurangabad crime news saam tv
महाराष्ट्र

नर्सवर बलात्कार केल्याप्रकरणी पाेलिसांनी डाॅक्टरला ठाेकल्या बेड्या; तिघे मित्र फरार

साम न्यूज नेटवर्क

- अविनाश कानडजे

औरंगाबाद : डॉक्टरने नर्सवर आपल्या तीन मित्रांसह बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरने तेथेच काम करणाऱ्या नर्सवर बलात्कार करून तिचा गर्भपात केला आहे. औरंगाबाद (aurangabad) येथील मुकुंदवाडी पाेलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तातडीने संबंधितावर कारवाई केली आहे.

या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी (police) डॉक्टर प्रसाद संजय देशमुख याला अटक केली आहे. या प्रकरणी पाेलिस दिपक पाटील सचिन शिंदे आणि शिंदेसोबतच्या अनोळखी मुलाचा शोध घेताहेत. गारखेडा येथील रुग्णालयात ही युवती नर्स (nurse) म्हणून तीन महिन्यापासून काम करत होती याच रुग्णालयातील (hospital) डॉक्टर प्रसादने तिच्या सोबत पडेगावातील फ्लॅटवर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यातूनच ती गरोदर राहिली. ही गोष्ट युवतीने डॉक्टरला सांगितल्यानंतर डॉक्टरने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यातून तिला जास्त त्रास झाल्याने ती पुन्हा डॉक्टरकडे गेली असता तिच्यावर डॉक्टरने तेव्हा देखील बलात्कार केला. (aurangabad crime news)

पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार डॉक्टर प्रसादच्या दोन मित्रांनी देखील तिच्यावर बलात्कार केला आहे. तर डॉक्टरच्या मावस भावाने देखील बलात्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु ती त्याच्या तावडीतून सुटली. भेदरलेल्या अवस्थेत दामिनी पथकाला या युवतीची माहिती लागली. त्यानंतर दामिनी पथकाने घटनास्थळी जाऊन युवतीस मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात हजर करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

SCROLL FOR NEXT