Aurangabad Crime News Saam TV
महाराष्ट्र

VIDEO : आधी केला देवाला नमस्कार, मग फुलं वाहून दानपेटीतील पैसे लंपास, चोरट्याचा कारनामा CCTVत कैद

चोराने आधी देवाला केला नमस्कार नंतर वाहिली फुलं वाहिली. आणि शेवटी दानपेटीवरच मारला डल्ला मारला.

Satish Daud

Aurangabad Crime News : अलीकडच्या काळात चोरी, दरोड्याच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चोरी करण्यासाठी चोर अनेक क्लृप्त्या लढवतात. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील एका गावातील मंदिरात चोरी करताना चोराने देवा मला माफ कर, अशी चिठ्ठी लिहून दानपेटी लंपास केली होती. आता अशाच काहीसा प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात घडला आहे.  (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

चोराने आधी देवाला केला नमस्कार नंतर वाहिली फुलं वाहिली. आणि शेवटी दानपेटीवरच मारला डल्ला मारला. हा प्रकार औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या पाचपीरवाडी गावातून समोर आलेला आहे.

पाचपीरवाडी गावातील टेकडी महादेव मंदिरात चोरट्यांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश केला. सुरुवातीला महादेवाच्या पिंडी वर फुल वाहिली. नंतर महादेवालाच नमस्कार केला आणि अगदी महादेवाच्या समोरच असलेल्या दानपेटीतील पैशांवर चोरट्यानी डल्ला मारला.

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, यातून चोरट्यांचा भक्ती भाव, देवा मला पाव आणि दानपेटीतली रक्कम घेऊन धाव. असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. चोरट्याच्या या प्रकारामुळे पाचपीरवाडी गावातील गावकरी सुद्धा हैराण झाले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रातील खासदारांना ५० कोटींना विकत घेतलं जात आहे, महत्त्वाच्या व्यक्तीने दिली माहिती - संजय राऊत

Luxury Bus Accident: भरधाव लक्झरी बस ट्रकला पाठीमागून धडकली, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू, २६ जखमी

Solapur Bhuikot Fort : सोलापूरच्या किल्ल्याला 'भुईकोट' नाव कसं पडलं? 'हे' आहे रंजक कारण

Gold Rate Today : आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, वाचा मुंंबई-पुण्याचे ताजे दर

Famous Actor : "माझ्या पत्नीने माझ्यासोबत एका बेडवर झोपायला नकार दिला..."; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT