Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad News : प्रेमाचा दु:खद अंत! 'तू जो पाहिला त्याच्यासोबत खूश रहा', चिठ्ठी लिहत तरुणाची आत्महत्या

प्रेम प्रकरणातून जवाहर नगर परिसरात एका तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

Aurangabad Latest News : औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जवाहर नगर परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

तरुणाने नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र,तरुणाच्या खिशात पोलिसांना (Police) एक चिठ्ठी देखील आढळून आली आहे. त्याच्यामध्ये प्रेम प्रकरणातून या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तरुण हा औरंगाबाद (Aurangabad) येथील जवाहरनगर परिसरात राहत होता तो मुळचा बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील चोंडी येथील होता. तो केटर्सचं काम करत होता. त्याने औरंगाबादमधील राहात्या आत्महत्या केली. प्रेम प्रकरणातून तरुणाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

चिठ्ठीमध्ये नेमकं काय?

पोलिसांना त्याच्या खिशात एक चिट्ठी आढळून आली आहे. ज्यामध्ये 'तू जो पाहिला त्याच्यासोबत खूश रहा मी तुला कधी श्राप देणार नाही पिल्ली I love you.. sorry' या आशेयाची सुसाईड नोट मिळून आल्यामुळे ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून असल्याचा जवाहर नगर पोलिसांचा अंदाज आहे. तसेच या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू अल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT