Aurangabad Police डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

Aurangabad Crime: दारु नशेत झालेल्या वादातून हत्या; खुनाचा २४ दिवसानंतर छडा

२४ दिवसांनंतर अखेर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाल्याने खूनाचा उलगडा झाला.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाल्यानं डोक्यात दगड घालून एकाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील टीव्ही सेंटर खून प्रकरणाचा सिडको पोलिसांनी अखेर २४ दिवसानंतर छडा लावला. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून अयाज बशीर खान याने सिद्धार्थ भगवान साळवे याचा खून केल्याची कबुली आरोपीने (Accused) दिली आहे. सीसीटीव्हीच्या (CCTV) पुराव्यावरून घटनेनंतर दोन दिवसांतच अयाजला चौकशीसाठी ठाण्यात बोलावले होते, परंतु नीट चौकशी न झाल्याने त्याला सोडून द्यावे दिले होते. (Aurangabad Latest Crime News In Marathi)

हे देखील पहा -

२४ दिवसांनंतर अखेर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाल्याने खूनाचा उलगडा झाला. टीव्ही सेंटर शॉपींग कॉम्पलेक्सच्या पाठीमागील मैदानात २० जानेवारीच्या रात्री सिद्धार्थ साळवे याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. २१ जानेवारीला सकाळी ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अयाज आणि अकबर हे दोघे शॉपींग कॉम्पलेक्सच्या पाठीमागील मैदानाजवळ दारू प्यायला बसलेले होते. मृत सिद्धार्थदेखील दारू घेऊन तेथे गेला.

दारू पिण्याच्या कारणावरून सर्वजण नशेत असल्याने साळवेने अकबरला शिव्या दिल्या. त्यांच्यात बाचाबाची झाली. अकबरने साळवेला ढकलून दिले. अकबर बाजूला झाल्यावर अयाजसोबत साळवेचा वाद सुरू झाला. त्यांचा वाद टोकाला गेल्यावर अयाजने मोठा दगड उचलून साळवेच्या डोक्यात घातला. साळवे निपचित पडल्यानंतर अयाजने परिसरातील कचरा, प्लास्टीक गोळा करून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही आग पाहिल्यावर अकबर मात्र तेथून पसार झाला. अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT