Aurangabad Crime: औरंगाबाद पुन्हा हादरलं! 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; दोन मुलांविरुद्ध गुन्हा Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime: औरंगाबाद पुन्हा हादरलं! 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; दोन मुलांविरुद्ध गुन्हा

एका ४ वर्षीय चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला घराच्या गच्चीवर नेऊन २ अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वाळूज उद्योगनगरामध्ये घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद: एका ४ वर्षीय चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला घराच्या गच्चीवर नेऊन २ अल्पवयीन मुलांनी बलात्कार (sexual assualt) केल्याची धक्कादायक घटना वाळूज (Waluj) उद्योगनगरामध्ये घडली आहे. चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून २ अल्पवयीन मुलांविरुद्ध एमायडीसी (MIDC) वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी शेजारील एक १३ वर्षीय आणि दुसऱ्या १० वर्षीय मुलाने चिमुकली खाऊ देत आपण गच्चीवर जाऊन खाऊ असे म्हणून गच्चीवर (terrace) नेले होते. तेथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. (Aurangabad Crime girl sexual harassment crime against two boy)

हे देखील पहा-

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या चिमुकलीने रडत आईकडे जाऊन आपबिती कथन केली आहे. तिच्या आईला मोठा धक्का बसला. रात्री पती घरी आल्यावर आपल्या चिमुकलीवर शेजारील दोघांनी बलात्कार केल्याचे सांगितले. रात्री मुलीवर घरच्या घरी उपचार केल्यावर घाबरलेल्या तिच्या पालकांनी तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी चिमुकली घेऊन पालक खाजगी रुग्णालयात (hospital) गेले होते.

डॉक्टरांनी पोलीस (Police) ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला आहे. चिमुकलीच्या आईने रविवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. त्यांनी चिमुकलीच्या पालकांना एमआयडीसी वाळूज पोलिस (Police) ठाण्यात आणले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी माहिती जाणून घेतली आणि विधिसंघर्षग्रस्त मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT