किल्ले रायगडावर अस्थिविसर्जन करण्याचा प्रयत्न? अखेर गुन्हा दाखल!  SaamTvnews
महाराष्ट्र

किल्ले रायगडावर अस्थिविसर्जन करण्याचा प्रयत्न? अखेर गुन्हा दाखल!

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर पुस्तक पुजनाच्या बहाण्याने अस्थिविसर्जन करण्याचा प्रकार ८ डिसेंबर रोजी घडला होता. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर पुस्तक पुजनाच्या बहाण्याने अस्थिविसर्जन करण्याचा प्रकार ८ डिसेंबर रोजी घडला होता. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी सामाजिक अशांतता निर्माण करणे, लोकभावना दुखावणे, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला या कारणाने चार जणांना अटक केली आहे.

हे देखील पहा :

किल्ले रायगडावर ८ डिसेंबर २१ रोजी पुणे येथील काही जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ सरसेनापती हंबीरराव या पुस्तकाचे आणि राखेचे पुजन करत होते. यावेळी त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे तिथे उपस्थित असलेल्या शिवप्रेमींच्या लक्षात आले. याबाबत शिवप्रेमींनी जाब विचारला असता दोन्ही गटात वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद रोखला. पोलिसांनी पूजेसाठी आणलेले साहित्य आणि पुस्तक ताब्यात घेतले.

दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर विसर्जनासाठी आणल्या असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला होता. त्यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शिवप्रेमीनी केली होती. यानंतर महाड तालुका पोलीसांनी तपास करून चार जणांविरोधात भादवी कलम १५३ (१) (अ) (ब), २९५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT