मुलीच्या नातेवाईकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न कैलास चौधरी
महाराष्ट्र

मुलीच्या नातेवाईकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न

याप्रकरणी युतीच्या कुटुंबातील सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उस्मानाबाद - तुळजापूर Tuljapur शहरातील प्रतीक्षा पुणेकर या अठरा वर्षीय युवतीचा शहरातीलच कुतवळ हॉस्पिटल येथील डॉक्टरचे Doctor चुकीचे उपचार व हलगर्जी केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत आज ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सांगता होण्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल disel ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी युतीच्या कुटुंबातील सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युवतीचे वडील प्रकाश पुणेकर व आई संजीवनी पुणेकर Sanjvani Punekar यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती.

हे देखील पहा -

वेताळ नगर भागात राहणारे प्रकाश पुणेकर व संजीवनी पुणेकर यांची एकुलती एक मुलगी प्रतीक्षा पुणेकर हिला उलटी होऊन पोटात दुखत असल्याच्या कारणाने शहरातील कुतवळ हॉस्पिटलमध्ये ४ फेब्रुवारी २०२० मध्ये अॅडमिट करण्यात आले होते. चार दिवस कुतवळ हॉस्पिटलमध्ये मुलीला ठेवण्यात आले व शेवटी ८ फेब्रुवारी २०२० ला पहाटे अचानक मुलीला सोलापूरला नेण्यास डॉक्टरांनी सांगितले.

दुर्दैवाने त्याच दिवशी मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉ. दिग्विजय कुतवळ Digvijay Kutuval यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी देऊनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्याने मुलीचे नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

SCROLL FOR NEXT