Satara: जावली बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न Saam Tv
महाराष्ट्र

Satara: जावली बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

डीएमके जावली सहकारी बँकेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सातारा: प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहामध्ये साजरा होत असताना साताऱ्यात आज सकाळीच थरारक चित्र बघायला मिळाले. डीएमके (DMK) जावली सहकारी बँकेत (bank) घोटाळा झाल्याचा आरोप (Allegations) करत एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही वेळ एकच खळबळ उडाली होती. (Attempt of self immolation of a woman alleging scam in Jawali Bank)

हे देखील पहा-

ज्योती नलावडे असे या महिलेचे नाव आहे. जावली सहकारी बँकेचे संचालक मंडळ आणि काही कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा तिचा आरोप आहे. ज्योती नलावडे यांनी या संदर्भात पोलीस तक्रार दाखल केली होती. मात्र, संचालकांवर कारवाई करून दोषारोप दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. यामुळे संतापलेल्या नलावडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज सकाळीच त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्या आणि स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

पोलीस मुख्यालयावर धनंजय मुंडेंसमोर; बोगस रस्त्यावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न..

बीड: बोगस रस्त्याविषयी कारवाई होत नसल्याने, एकाने पोलीस मुख्यालयावर (Police Headquarters) झेंडावंदनस्थळी धनंजय मुंडेंसमोर (Dhananjay Munde) आत्मदहन (Self-immolation) करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी झेंड्याच्या समोरचं अंगावर डिझेल (Diesel)ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: 36 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! भारतीय ज्युडोपटूंचा इतिहास; अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांची सुवर्णपदकाची कमाई

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

गुलाबी अदा! प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नजर हटत नाही

BJP: मोठी बातमी! भाजपला मोठा हादरा, आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

नीट पेपर फुटतो कसा? सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल; सरकारला या २ गोष्टी सूचवल्या, बघा VIDEO

SCROLL FOR NEXT