Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: चार तलाठ्यांना जीवे मारण्याचा झाला प्रयत्न

या घटनेनंतर वाळू तस्करांच्या दादागिरीमुळे महसूल विभागात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अरूण जोशी

अमरावती : अमरावती (amravati) जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यातील (daryapur) नांदेड बुद्रुक रेती घाटामध्ये अवैधरित्या वाळूची (sand) तस्करी करताना त्यांना अटकाव करताना तलाठ्यांना (talathi) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. (amravati latest marathi news)

दर्यापूर तहसीलदार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी अतुल दाळू , राहुल आवारे, भारत महाजन, सौरभ वानखडे या चार तलाठ्यांना रेती घाटात पाठविले. त्यावेळी वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर चालक मालक वाळू घेऊन घाटातून निघून गेला होता.

त्याचा या चारही तलाठ्यांनी पाठलाग केला व थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तलाठ्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तलाठ्यांची चारचाकी गाडीस धडक देत ट्रॅक्टर पळवून ताे निघून गेला. या घटनेची तक्रार तलाठी राहुल आवारे यांनी दर्यापूर पोलीस स्टेशनला दिली. पाेलिसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

मुंबईत 12 मार्च 1993 ची पुनरावृत्तीचा डाव? मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी?

महाराष्ट्रासाठी काही करायचं असेल, तर....; राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र

Maharashtra Politics: काँग्रेसने केला भाजपचा गेम, बालेकिल्ल्यातच भाजपला दिला शह

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, ८.१९ मिनिटांनी जाणवले हादरे

SCROLL FOR NEXT