Shegaon Police Station संजय जाधव
महाराष्ट्र

Buldhana: अज्ञातांकडून शेगाव पोलीस स्टेशनवर हल्ला, फर्निचरची तोडफोड...

या जमावाने पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तोडफोड केली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.

संजय जाधव

बुलढाणा - शेगाव शहरातील विश्वनाथ नगर येथे एकीकडे वाढदिवस कार्यक्रम सुरू होता. तिथे डीजे लावण्यात आल्यावरून गोंधळ झाला. या भागात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याने त्या कर्कश आवाजाचा इतर नागरिकांना त्रास व्हायला लागला होता. तेव्हा काही सुज्ञ नागरिकांनी शेगाव पोलिसांना (Police) फोन करून याबाबाद माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर शेगाव (Shegaon) पोलिसांनी घटनास्थळ गाठून डीजे बंद करण्यास सांगितले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर डीजे बंद झाला. (Buldhana Latest News)

हे देखील पहा -

यानंतर काही अज्ञातांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. जवळपास ३० जणांचा जमाव शेगाव पोलीस ठाण्यावर धावून आला.समाजकंटकांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्ला करत पोलीस ठाण्याची तोडफोड केली. या अज्ञातांनी पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

समाजकंटकांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सामान्य नागरिकांविरोधात कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस आता हल्लेखोरांविरोधात काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT