Attack On Sangeeta Thombre  Saam Digital
महाराष्ट्र

Attack On Sangeeta Thombre : भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अज्ञातांच्या हल्ल्यात जखमी

Attack On Sangeeta Thombre Car : भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर आज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील दहिफळ वडमावली येथून केजकडे जात असताना हा प्रकार घडला आहे.

Sandeep Gawade

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर आज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील दहिफळ वडमावली येथून केजकडे जात असताना हा प्रकार घटला.दगडफेकीत माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह चालक किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांकडून घटनेची दखल घेतली असून अज्ञातांचा शोध घेण्यात येत आहे.

प्राध्यापक असलेल्या संगीता ठोंबरे 2012 च्या केज विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथम राजकारणात आल्या होत्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचा पराभव करुन ठोंबरे यांनी भाजपच्या आमदार झाल्या होत्या. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने संगीता ठोंबरे यांना उमेदवारी नाकारुन नमिता मुंदडा यांना रिंगणात उतरवलं होतं.

दरम्यान आज त्या बीडच्या केज तालुक्यातील दहिफळ वडमावली येथून केजकडे निघाल्या होत्या. यावेळी आज्ञातांकडून त्यांच्या कारवर अचानक दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या कारच्या काचा फुटल्या आहेत. तसंच त्या स्वत: जखमी झाल्या आहेत. तर चालकही जखमी झाला असून त्यांना तात्काळ केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अज्ञांतांचा शोध सुरू केला आहे. दगडफेक केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. त्यामुळे अद्याप कोणीच हाती लागलेलं नाही. मात्र हा हल्ला करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून आमदारांच्या कारवर हल्ले करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT