जालन्यात वाळू माफियांकडून महसूल विभागाच्या पथकावर हल्ला! SaamTvNews
महाराष्ट्र

जालन्यात वाळू माफियांकडून महसूल विभागाच्या पथकावर हल्ला!

या हल्ल्यात महसूल विभाचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. तर, वाहनांची जमावाने तोडफोड केली.

लक्ष्मण सोळुंके

जालना : अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाई करायला गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना भोकरदन (Bhokardan) तालुक्यातल्या वालसा-खालसा गावात घडलीय. या हल्ल्यात महसूल च्या दोन कर्मचारी जखमी तर हल्लेखोरांनी दगड फेक केल्याने शासकीय वाहनांचे ही नुकसान झाले असल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारी वरून भोकरदन पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पहा :

तालुक्यातील वालसा-खालसा गावात बेसुमार वाळु (Sand) उपश्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सारिका कदम यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे महसूल विभागाचे पथक गावात दाखल झाले. मात्र, पथक येणार असल्याची माहिती अवैध वाहतूक करणाऱ्या माफियांना (Sand Mafia) लागताच त्यांनी पळ काढला. महसूल पथकाने या बाबत गावच्या मंदिर परीसरात असलेल्या नागरिकांना विचारणा करायला गेलेल्या महसूल विभागाच्या पथकासोबत 50 ते 60 जणांनी हुज्जत घालण्यास सुरवात केली.

उग्र झालेल्या जमावाने पथकावरती हल्ला केला. या हल्ल्यात महसूल विभाचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. तर, वाहनांची जमावाने तोडफोड केली. ह्या हल्ल्याचा तलाठी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत, हल्ला करणाऱ्या वाळू माफियांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आलीय.

या हल्ला प्रकरणी तलाठी शाहूराज पंडित कदम यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलिस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय मालमतेचे नुकसान करणे,आणि पथकावर हल्ला केल्या प्रकरणी गणेश गोविंद बदर, किशोर प्रधान, विलास बदर, गजानन सांडु वाघ, राजु बदर उर्फ पोस्टमन, सिद्धार्थ जाधव, व नाव माहीत नसलेले नाव अश्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT