Gondia Crime News saam tv
महाराष्ट्र

Crime News: सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार; पाच अटकेत

पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत अशी माहिती बबन आव्हाड (पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया) यांनी दिली.

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदिया (gondia) कटंगी कला गावशिवारात 28 जानेवारीस धनेंद्र शिवराम भुरले (dhanendra bhurle) हे टेमनी येथील आपले शेतात गेले असता परत येत असताना टेमणी ते कटंगीकला रस्त्यावर असलेले महाराजा धाब्याचे जवळ दुचाकीवर आलेल्या दोन इसमानी अग्नीशस्त्राने भुरले यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने गोळी झाडली होती. ती गोळी भुरले उजव्या गालाला लागली असुन ते त्यामध्ये जखमी झाले. भुरले हे जखमी अवस्थेत गोंदिया शहर (gondia city) गाठले. तेथून ते पोलीस स्टेशनला गेले असता क्षणाचाही विलंब न करता भुरले यांस पाेलिसांनी गोंदिया येथील जिल्हा शासकीय रूग्णालय (gondia district general hospital) दाखल केले.

भुरले यांनी उपचारानंतर झालेल्या प्रकरणाची तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधिक्षकांच्या आदेशने स्थानिक गुन्हे, पोलीस स्टेशन गोंदिया (gondia) शहर व रामनगर यांचे तपास पथके तयार करण्यात आले. पथकाने जलद गतीने तपासाची चक्रे फिरवत भुरले यांच्या तक्रारीवरुन संशयित आरोपी उदय गोपलानी व गणेश जाधव यांना अटक (arrest) केली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने उदय गोपलानी यांचेकडे जमीन विक्रीचे व्यवसायात मदत करणारे निरज गुरलदास वाधवानी यास ताब्यात घेतले. त्याच्या चाैकशीनंतर नरेश नारायण तरोणे व शिवशंकर भैय्यालाल तरोणे यांच्यासोबत मोटार सायकलने घटनास्थळी जावुन अग्निशस्त्राचा वापर करून गोळी झाडुन भुरलेस जिवे मारण्याचा उद्देशाने जखमी केले असल्याचे कबूल केले आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Gondia Crime News)

या घटनेतील 5 संशयित आरोपींना गोंदिया पोलिसांनी (police) अटक केली आहे. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत अशी माहिती बबन आव्हाड (पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT