atpadi bandh saam tv
महाराष्ट्र

Gopichand Padalkar: चप्पलफेक हल्ल्याचा निषेर्धात आटपाडीत कडकडकीत बंद

Atpadi Bandh: इंदापूर येथे आमदार गाेपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक झाल्याचा प्रकार घडला हाेता.

विजय पाटील

Sangli News :

ओबीसी आरक्षण अबाधित राहावं आणि इंदापूर येथे झालेल्या आमदार गोपीचंद पडळकर (mla gopichand padalkar) यांच्या वरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज (गुरुवार) सांगली जिल्ह्यातील आटपाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आजच्या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आटपाडी शहरात आणि मोर्चा मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Maharashtra News)

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई करण्यास पुढे मागे पाहिलेले नाही. त्यांच्या हाकेला धनगर समाजातील लोकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत राज्यात माेर्चा देखील काढला.

दरम्यान इंदापूर (indapur) येथे आमदार गाेपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक झाल्याचा प्रकार घडला. या प्रकाराचा निषेध नाेंदविण्यासाठी आज सकल ओबीसी समाजाच्यावतीने आटपाडी शहर बंदची हाक देण्यात आली हाेती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओबीसी समाजाच्या हाकेस आटपाडी शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आज सकाळपासून आटपाडी शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ओबीसी आरक्षण अबाधित राहावं यामागणीसह पडळकरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आटपाडी बस स्थानकापासून ते तहसिल कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चावेळी आमदार गोपीचंद पडळकर व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आटपाडी शहरात आणि मोर्चा मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT