Chandrapur News Saam Tv
महाराष्ट्र

चंद्रपूरमध्ये उपग्रहाचे अवशेष कोसळल्याची खगोलशास्त्रज्ञांना शंका

आकाशातून पडलेला हा गोळा नक्की काय आहे याबाबत मात्र चर्चांना उधाण आले आहे.

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर

मुंबई - महाराष्ट्रातल्या (Maharashtra) काही जिल्ह्यात अवकाशातून एक रोषणाई जाताना दिसली. ही रोषणाई आगीच्या गोळ्यांप्रमाणे असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आकाशात ही रोषणाई दिसली. सुरुवातीला लोकांना एखादा धुमकेतू जात असल्यासारखं वाटलं मात्र, त्यासंदर्भात आता अनेक धक्कादायक माहिती आता पुढे येत आहेत. आता या वस्तुचे काही अवशेष चंद्रपुरामध्ये (Chandrapur) आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग सापडला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा आढळला आहे. पवनपार लगतच्या जंगलात हा गोळा आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. प्रशासनाने स्थानिकांशी संपर्क साधत नक्की घटनेची माहिती घेतली आहे. आकाशातून पडलेला हा गोळा नक्की काय आहे याबाबत मात्र चर्चांना उधाण आले आहे. हे एखाद्या उपग्रहाचे अवशेष असावेत, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT