fighting Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: माजी नगरसेवकासह भावावर खूनी हल्ला; चार अटकेत, चाैघांचा तपास सुरु

या प्रकरणाचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

विजय पाटील

सांगली : माजी नगरसेवक संदीप तांबवेकर आणि त्यांच्या बंधूंवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक (arrest) केली असून अन्य चाैघांचा तपास सुरु आहे. ही कारवाई आष्टा (sangli) पाेलिसांनी (police) तांबवेकर यांच्या तक्रारीनंतर केली आहे. (sangli latest marathi news)

या घटनेची अधिक माहिती अशी : नातेवाइकांची बदनामी करण्याच्या कारणावरून येथील एका बार मालकाच्या टोळीने माजी नगरसेवक संदीप तांबवेकर आणि त्यांचे बंधू प्रदीप तांबवेकर यांना लोखंडी गज काठ्यांनी मारहाण केल्याची तक्रार संदीप तांबेकर यांनी आष्टा पोलिस ठाण्यात दाखल केली.

त्यानूसार पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी विशाल शिवाजी पवार, विश्वजीत उर्फ पोपट दिलीप गायकवाड, किरण निवृत्ती मस्के, संग्राम अर्जुन सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी, लोखंडी गज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील अन्य चाैघांचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT