Amit Shah Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Amit Shah: 'त्याग केला, तुम्हाला CM पद दिले, आता...' अमित शहांचे एकनाथ शिंदेंना उद्देशून मोठे विधान; नेमका डाव काय?

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेची घोषणा झाल्यानंतर जागा वाटपांसाठी जोर- बैठका सुरु आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून महत्वाचे विधान केले आहे.

Gangappa Pujari

Amit Shah On Eknath Shinde: राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकालाचा गुलाल उधळला जाणार आहे. विधानसभेची घोषणा झाल्यानंतर जागा वाटपांसाठी जोर- बैठका सुरु आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून महत्वाचे विधान केले आहे. ज्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असतानाच महायुतीमध्ये मात्र जागा वाटपावरुन खटके उडत असल्याचे दिसत आहे. महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदेना दिलेल्या मुख्यमंत्रीपदाबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्रीपदावेळी आम्ही त्याग केला, आता तुम्ही झुकते माप घ्या.. असा सल्ला अमित शहा यांनी दिला आहे.

"देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल ही तीनच महत्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्रीपदासह सर्व पदे फक्त काम होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले, तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला.." असे अमित शहा म्हणाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. शहांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदाचा दाखला देत जागा वाटपात नरमाईने भूमिका घेण्याची रणनिती भाजप हायकमांडने आखल्याचीही चर्चा सध्या सुरु आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महायुतीने आज महत्वाची पत्रकार परिषद बोलावली आहे. आज सकाळी ११ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॉमन मॅन, त्यांना कोणीही डिस्टर्ब करू शकत नाहीत - मंत्री प्रकाश आबिटकर

Sweet Potato Chips: उपवासाला बनवा रताळ्याचे कुरकुरीत वेफर्स; रेसिपी लगेच नोट करा

Watermelon Storage Tips: कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवायचा की नाही? जाणून घ्या

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT