Assembly Election 2023 Result Saam Digital
महाराष्ट्र

Assembly Election 2023 Result: तिन्ही राज्यातील भाजपच यश म्हणजे काँग्रेसच्या अहंकाराला चपराक: खासदार अनिल बोंडे यांचे टीकास्त्र

Assembly Election 2023 Result: राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये आज भाजपाला मोठे यश मिळाल्यानंतर अमरावतीच्या भाजप कार्यालयात खासदार अनिल बोंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Sandeep Gawade

Assembly Election 2023 Result

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये आज भाजपाला मोठे यश मिळाल्यानंतर अमरावतीच्या भाजप कार्यालयात खासदार अनिल बोंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी शेतमजूर, मातृ शक्तीने नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला आहे. त्यामुळे तिन्ही राज्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे ही काँग्रेसच्या अहंकाराला मोठी चपराक आहे, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी दिली आहे.

खासदार अनिल बोंडे म्हणाले, ज्या ज्या वेळी काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्या त्या वेळेला नरेंद्र मोदी यांना जनतेने पाठिंबा दिला आहे. ज्यावेळी मोदी यांना मौत का सौदागर म्हटलं तेव्हा गुजरातमधून काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. ज्यावेळी राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है म्हटलं तेव्हा लोकसभेतून काँग्रेसला बाहेर पडावं लागलं आणि यावेळीही राहुल गांधी यांनी मोदींविषयी अपशब्द वापरले असताना तिन्ही राज्यात काँग्रेसचा पराभव होताना दिसत असल्याचा दावा केला आहे.

येणाऱ्या काळात भारताला महासत्ता बनवण्यासाठी नरेंद्र मोदींना जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वासाच्या जोरावर 2024 मध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनतील. मोदींशिवाय देशाला पर्याय नाही आणि देशात त्यांचा करिष्मा माजही कायम असल्याचे ते म्हणाले. अमरावतीच्या भाजप कार्यालयात जल्लोष केल्यानंतर हे यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय आहे, लोकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला त्यामुळे मोदी है तो मुमकिन आहे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT