Assault on a young man in a beer bar in mohadi, bhandara अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

Bhandara: बिअर बारमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; हल्लेखोर स्वतःच पोहोचले पोलीस ठाण्यात

Assault on a young man in a beer bar in mohadi, bhandara : विशेष म्हणजे हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर स्वत: मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा: वर्चस्वाच्या वादात एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या मोहाडी (Mohadi) येथील युवराज बिअर बारमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे हल्लेखोर तरुणांनी हल्ला केल्यानंतर स्वत: मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली आहे. दिनेश झाडू मारबते (28), रा. मोहाडी असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर सचिन ऊर्फ सोनू गजानन मेहर (37) रा. मोहाडी आणि महेश रवी चिंधालोरे रा. तुमसर असे आरोपींचे नाव आहे. जखमी तरुणाला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Assault on a young man in a beer bar in mohadi, bhandara; The assailants themselves surrendered to the police)

हे देखील पाहा -

मिळाळेल्या माहितीनुसार हल्ला झालेला पीडित दिनेश मारबते हा तरुण सायंकाळी मोहाडी येथील युवराज बिअर बारमध्ये गेला होता. त्याठिकाणी आरोपी सचिन आणि महेश आले. वर्चस्वाच्या लढाईत त्यांच्यात वाद झाला. या वादात सचिन आणि महेशने आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्राने दिनेशवर सपासप वार केले. या हल्ल्यात दिनेशच्या मानेला आणि चेहऱ्याला जबर दुखापत झाली आहे. जखमी दिनेशला तात्काळ मोहाडी आरोग्य केंद्रात आणि नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमी आणि हल्लेखोर गुंड प्रवृत्तीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर सचिन आणि महेश थेट मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी आपण हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून जखमी दिनेशच्या जबाबनंतर गुन्हा (Crime) नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. याप्रकरणी पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

SCROLL FOR NEXT