Ashok Kharat saam tv
महाराष्ट्र

अशोक खरातची शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात 11 एकर जमीन; नाशिक, शिर्डी, पुण्यानंतर खरातचं सोलापूर कनेक्शन उघड

Ashok kharat Case: अशोक खरात यांच्या प्रचंड मालमत्तेचा खुलासा झाला आहे. सोलापूरमधील शक्तीपीठ महामार्गाजवळील ११ एकर जमिनीचा समावेश आहे.

Bharat Jadhav

भोंदू बाबा अशोक खरातने पुणे, शिर्डी, नाशिकसह अन्य मोठ्या शहरांमध्ये कोट्यावधींची मालमत्ता खरेदी केली असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. खरातने सोलापुरात देखील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात अशोक खरातने कोट्यावधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. या गावातील गट क्रमांक २००/१ मधील ४.४८ हेक्टर म्हणजे सुमारे ११ एकरांपेक्षा अधिक जमीन अशोक खरातच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे.

दरम्यान, २८ मार्च २०२४ रोजी झालेल्या या व्यवहाराची किंमत तब्बल २ कोटी ४० लाख ९१ हजार २०० रुपये इतकी असल्याची नोंद खरेदी खतात आहे. या व्यवहारात अशोक खरातची पत्नी कल्पना अशोक खरात हिला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आलेले असल्याचेही खरेदी खतात नमूद आहे. या उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार कळमण गावात जमिनीचे साधारण भाव हे प्रति एकर ५-६ लाख रुपये प्रति एकर आहेत. मात्र भोंदू अशोक खरातने तब्बल २१ ते २२ लाख रुपये प्रति एकर ही जमीन खरेदी केली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण हद्दीत पत्नीच्या नावे जमीन खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. नियोजित शक्तिपीठ महामार्ग कळमण हद्दीतून जाणार असल्याची माहिती मिळाल्याने खरातने ही जमीन खरेदी केली असल्याची शक्यता आहे.

कल्पना खरात कुठे गायब? 10 दिवसांपासून पोलिसांना चकवा

अशोक खरातच्या अटकेनंतर त्याची पत्नी म्हणजेच कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने कंबर कसली आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार आहे. दहा दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागले नसल्याने, आता तपास यंत्रणेने तिचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि घरगुती नोकरांकडे तपासाचा मोर्चा वळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नसरापूर प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; नराधम भीमराव कांबळने सगळं सांगितलं, आज गावकऱ्यांकडून बंदची हाक

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये तापमानाचा पारा 43 अंश पार, बैल जोडीचा "हीट स्ट्रोकने" मृत्यू

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसानच्या ₹२००० च्या हप्त्याची तारीख ठरली, मोठी अपडेट आली समोर

Riteish-Raja Shivaji Collection : शिवरायांच्या शौर्याची देशभरात गर्जना! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची दुसऱ्या दिवशीही बंपर कमाई, नवा रेकॉर्ड केला

Summer Oily Skin Care Tips: उन्हाळ्यात तेलकट त्वचेवर रामबाण उपाय; चंदन आणि दह्याचा फेसपॅक देईल नॅचरल ग्लो

SCROLL FOR NEXT