ashok chavan statement on maratha reservation new gr nanded  saam tv
महाराष्ट्र

Ashok Chavan On Maratha Reservation New GR : ...तरच सकल मराठा समाजाला न्याय मिळेल : अशाेक चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांनी आज साम टीव्हीशी संवाद साधता नव्या अध्यादेशाबाबत भूमिका मांडली.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

मराठा आरक्षणाचा (maratha reservation latest marathi news) निर्णय आज झाला. हा मराठ्यांचा विजय झाला ही आनंदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी दिली. ते नांदेड येथे साम टीव्हीशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

अशोक चव्हाण म्हणाले ज्यांच्याकडे पूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आणि सागेसोयरे असा शब्द वापरण्यात आलेला आहे. आरक्षणात मराठ्यांची संख्या वाढेल. शासनाने अध्यादेश (Maratha Reservation New Gr) काढला आहे. त्यावर हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

हा विषय स्वागतार्ह आहे. त्यातून बऱ्या प्रमाणात नोंदी असलेल्यांना फायदा मिळेल असेही आमदार अशोक चव्हाण यांनी नमूद केेले. ते म्हणाले परंतु सरसकट सर्वांना आणि इतरांना ज्यांच्याकडे पूर्वीचे दाखले नाहीत किंवा प्रमाणपत्र नाहीत त्यांचा विषय अजूनही अनुत्तरीत आहे.

तोही प्रश्न मार्गी लागला तर पूर्णपणे सकल मराठा समाजाला न्याय मिळेल असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यांच्याकडे प्रमाणपत्र नाहीत तो मार्ग कसा काढायचा यावर सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी चव्हाणांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुरुवात चांगली आहे, शेवट गोड व्हावा अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा मराठा आरक्षण उप समितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Maharashtra Live News Update : पुणे तिथे काय उणे..पुण्याच्या करवंदे काकांनी सिंहगड किल्ला केला १ हजार ७०६ वेळा सर

Diwali 2025: दिवाळीत मातीचेच दिवे का लावतात? त्याचे फायदे काय?

Saree Dress Design: आईच्या जुन्या साड्यांपासून तयार करा 'हे' ट्रेंडी ड्रेस; कोणत्याही सणांसाठी आहे कम्फर्टेबल आणि बेस्ट

SCROLL FOR NEXT