Ashok Chavan challenges Nana Patole to provide proof saam tv
महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये येणार? संतप्त प्रतिक्रिया देत सर्वच सांगितलं

Ashok Chavan Angry Reaction On Congress Comeback Rumours: अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. नाना पटोले काय माझे मालक आहेत का?” असा सवाल करत त्यांनी पुरावा दाखवण्याचे आव्हान दिले.

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

काँग्रेसमध्ये पुन्हा घरवापसी करणार असल्याच्या चर्चांवर भाजपचे राज्यसभा खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले काय माझे मालक आहेत का? मी घरवापसीबाबत कुठे बोललो आहे? याचा एक पुरावा दाखवा, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस पक्ष सोडलेल्या देशातील पाच माजी मुख्यमंत्र्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचाही समावेश असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्या संभाव्य घरवापसीबाबत भाष्य केले होते. अशोक चव्हाण यांनी महत्त्वाच्या काळात काँग्रेस सोडल्यामुळे राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविषयी तीव्र रोष असल्याचे नाना पटोले म्हणाले होते. मात्र, देशातील राजकीय वातावरण बदलत असल्याने अनेक जण काँग्रेसच्या मूळ प्रवाहात येण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांच्या घरवापसीबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे हायकमांड घेईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले होते.

नाना पटोले यांच्या या विधानावर आता अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी काँग्रेसमध्ये परत येणार असल्याचे कधी बोललो आहे? याचा एक पुरावा दाखवा, असे आव्हानच त्यांनी दिले. तसेच, नाना पटोले काय माझे मालक आहेत का? असा सवाल करत त्यांनी या चर्चांवर संतप्त प्रतिक्रिया दिली. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या काँग्रेसमधील संभाव्य घरवापसीच्या चर्चांना फुलस्टॉप मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोजागिरी पोर्णिमे निमित्ताने श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकारांचा साज

100 कोटी रुपयांचा व्यवहार अन् 38 पथकांची 38 ठिकाणी धाडी,1424 बँक खाती फ्रिज; काय आहे सरकारचं ऑपरेशन ट्रायडेंट?

Diwali Kitchen Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईत किचनच्या 'या' 7 जागांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Height Growth Tips : उंची वाढवण्यासाठी हे विटामिन आहे सर्वात महत्त्वाचं! पालकांनो, आजच मुलांच्या आहारात करा हा बदल

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT