Ashadhi Wari Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Wari 2024: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ, शिंदे सरकारचा निर्णय; VIDEO

2024 Pandharpur Wari Became Toll Free: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे| ता. ३ जुलै २०२४

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा जीआरही काढण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यभरातील विठुरायाच्या भक्तांना सध्या आषाढी एकादशीचे वेध लागले आहेत. पंढपुरला विठुरायांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. अशातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी केलीआहे.

१७ जुलै रोजी पंढपुरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरमध्ये जात असतात. या सर्व वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तीन जुलैपासून ते 21 जुलै पर्यंत ही टोलमाफी असणार आहे. अक्षय महाराज भोसले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

दरम्यान, वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांना परिवहन विभागातून आवश्यक स्टिकर्स वाहनांना दिले जाणार आहेत. ३ जुलै ते २१ जुलै दरम्यान या कालावधीत ही सवलत राहणार आहे. गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणारे सर्व नाक्याांवर ही टोलमाफी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंब्र्यात दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

IPL Schedule : आयपीएल वेळापत्रक जाहीर, या तारखेला पहिला सामना; कोणत्या तारखेला कोण भिडणार? वाचा

LPG Cylinder: इराण-अमेरिकेच्या युद्धानं गॅसची टंचाई, उद्योग ठप्प, हॉटेल बंद...; राज्यभरातील परिस्थिती काय, जाणून घ्या?

Sulochana Chavan: सोळावं वरीस धोक्याचं....अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव रंगणार, कधी आणि कुठे?

प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नानंतर अवघ्या ४ वर्षांनी झाले वेगेळे

SCROLL FOR NEXT