Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde News Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde News: शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे

Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde News: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला साकडे घातले.

Satish Daud

Ashadhi Ekadashi 2023 CM Eknath Shinde News: 'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला साकडे घातले.

'बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. राज्यात पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे मागणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विठ्ठलाच्या चरणी मागितले.

यावेळी विठुरायाच्या नामाने अवघे पंढरपूर (Pandharpur) दुमदुमून गेले होते. दरम्यान, महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विकास आराखड्यासह इतर अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

शासकीय महापूजेनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री?

शासकीय महापूजेनंतर सत्कार सोहळ्यातून उपस्थिताना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2023) आज मला आणि माझ्या कुटुंबाला शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मिळालं, त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरामध्ये मंगलमय वातावरण झालेलं आहे, असं शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मला पत्रकारांनी विचारला, की तुम्ही विठुरायाला काय मागितलं. आता विठुरायाकडे काय मागणार, बळीराजाला चांगले दिवस येऊदेत, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊदेत. राज्यात पाऊस चांगला पडू दे. हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे. राज्यातील सर्व घटक सुखी समाधानी झाले पाहिजे. त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजेत हाच आपला उद्देश आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या सोईसाठी केलेल्या नियोजनाचाही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन उल्लेख केला. ते म्हणाले, लाखो वारकऱ्यांची गैरसोय नाही म्हणून मी ३-४ दिवसापूर्वी पंढरपुरात आलो होतो. यावर्षी उत्तम नियोजन आपण पाहिलं. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या सगळ्यांनी मिळून अतिशय उत्तम नियोजन केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. वारकरी बंधूंनी सहकार्य केले त्यांचे मी आभारी आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

SCROLL FOR NEXT