asha sevika morcha at nashik guardian minister dada bhuse office malegoan  saam tv
महाराष्ट्र

Nashik News : मालेगावात पालकमंत्री दादा भुसेंच्या कार्यालयावर धडकला आशा सेविकांचा मोर्चा

Asha Sevika Morcha : सिटूच्या नेतृत्वाखाली आजचा मोर्चा काढण्यात आला.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News :

आशा स्वयंसेवका (asha worker latest marathi news) ,गट प्रवर्तक या गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी संपावर गेल्या आहेत. सरकार त्यांच्या मागण्यांबाबत लक्ष देत नसल्याचा दावा करीत आज (बुधवार) त्यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (nashik guardian minister dada bhuse) यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. (Maharashtra News)

आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट दोन हजार रुपये दिवाळी पूर्वीच देण्यात यावी, मानधनात 7 हजार रुपयांची वाढ मान्य केली असता त्याची अमलबजावणी करावी, ऑनलाईन गटप्रवर्तकांचे कामाची सक्ती थांबवावी या व अन्य मागण्यांसाठी सिटूच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातून आशा स्वयंसेविका , गटप्रवतर्क सहभागी झाल्या होत्या. मंत्री भुसे हे नाशिकला असल्याने माेर्चेकरांची आणि मंत्री दादा भुसेंची भेट हाेऊ शकली नाही असे आंदाेलकांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT