शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आशा बुचकेंचे भाजपकडे प्रस्थान... SaamTv
महाराष्ट्र

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आशा बुचकेंचे भाजपकडे प्रस्थान...

जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषद सदस्य आशा बचुके आज शिवसेनेच्या पदाधिका-यांसह भाजपात प्रवेश करणार आहे.

रोहिदास गाडगे

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषद सदस्य आशा बचुके आज शिवसेनेच्या पदाधिका-यांसह भाजपात प्रवेश करणार आहे. किल्ले शिवनेरीतुन शक्तीप्रदर्शन करत शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह भाजपा प्रवेशासाठी निघाले आहते. आज विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या भाजपात प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री संजय बाळा भेगडे आणि जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश होत आहे.

हे देखील पहा -

जुन्नर तालुक्यात गेल्या वीस वर्षांपासून शिवसैनिक म्हणुन पक्षवाढीसाठी एकनिष्ठ राहून त्यांनी काम केले. जिल्हा परिषद सदस्य म्हणुन त्यांची कारकिर्द पुणे जिल्ह्यात आक्रमक राहिली आहे. याच दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची शिवसेनेतुनच हकालपट्टी करण्यात आली तरी त्यांनी शिवसेनेशी असलेली निष्ठा पाळत पक्षाशी बांधिल राहिल्या.

पण, आता पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या विचारविनिमयाने त्यांनी भाजपाचे कमळ हातात घेत शिवसेनेला धोबीपछाड करण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपाने जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांचा भाजपात सामील करून किल्ले शिवनेरीतच शिवसेनेला खिंडार पाडण्यात यश मिळवले आहे. राज्यात तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन झाली आणि भाजप हा एकमेव पक्ष विरोधात बसला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीसाठी भाजपाकडून हि मोर्चेबांधणी सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Badshah : व्यवसाय, रिअल इस्टेट गुंतवणूक अन् बरंच काही; बादशाहा किती कोटींचा मालक?

Vande Bharat Sleeper : वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढच्या महिन्यात धावणार, बुलेट ट्रेनवरही रेल्वे मंत्र्यांचे मोठं वक्तव्य

Vivah Muhurat 2026 Date: सनई चौघडे वाजणार! २०२६ मध्ये लग्नासाठी ५९ शुभ मुहूर्त, आताच तारखा बघून घ्या...

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदची निवडणूक रद्द होण्याची शक्यता

Famous Director Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, ५३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT