- सागर निकवाडे
Nandurbar News : महापुरुषांचा सातत्याने विविध वक्तव्याने अपमान करणा-या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (shiv pratishthan hindustan chief sambhaji bhide) यांना सात दिवसांत अटक करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आज (शुक्रवार) नंदुरबार येथे बहुजन समाज पार्टीने महाराष्ट्र सरकारला दिला आहे. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे यांनी साम टीव्हीशी बाेलताना भिडे यांच्यावर टीका केली. (Maharashtra News)
ब्राह्मणे म्हणाले संतांची भूमी अशी ओळख महाराष्ट्राची आहे. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसारच वाटचाल करीत पुरोगामी महाराष्ट्राने अवघ्या देशासह विश्वाला प्रेरणा दिली आहे. मात्र काही तथाकथितांकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान गेल्या काही काळात केला जात आहे.
संभाजी भिडे (sambhaji bhide) या व्यक्तीकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान केला जात आहे. संभाजी भिडे यांनी यापूर्वी महात्मा गांधी तसेच महात्मा ज्योतिराव फुले व इतर महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले आहेत.
राज्य सरकारचे अभय असल्याने संभाजी भिडे असे अपशब्द बोलत आहे. राज्य सरकार राजकीय फायदा करण्यासाठी संभाजी भिडे यांच्यावर कुठलीही कारवाई करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
समाजा समाजात दुही निर्माण करणाऱ्या सातत्याने महापुरुषांच्या अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांना सात दिवसाच्या आत अटक करावी अन्यथा सात दिवसानंतर बहुजन समाज पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल असेही ब्राह्मणे यांनी नमूद केले.
दरम्यान बहुजन समाज पक्षाच्या वतीने संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध नाेंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे, जिल्हा प्रभारी जितेंद्र तायडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.