beed, Arrest Sambhaji Bhide saam tv
महाराष्ट्र

Arrest Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या अटकेसाठी 'वंचित' आक्रमक, मणिपूर घटनेचा नाेंदविला निषेध

सरकारने यावर कारवाई केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

विनोद जिरे

Beed News : महापुरुषांचा सातत्याने विविध वक्तव्याने अपमान करणा-या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (sambhaji bhide) यांना अटक करा या मागणीसाठी आज (गुरुवार) बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे वंचित बहुजन आघाडीने (vanchit bahujan aghadi) आंदाेलन छेडले.यावेळी आंदाेलकांनी मणिपुर घटनेतील संशयित आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणीही केली. (Sambhaji Bhide Latest Marathi News)

माजलगाव (beed) शहरातील तहसील कार्यालयासमोर आज वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन करत सरकारचा निषेध केला. राज्यासह देशभरामध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर महापुरुषांच्या विरोधात संभाजी भिडेंसारखे माणसं गरळ ओकतात. मात्र सरकार अद्याप त्यांना अटक करत नाही.

यामुळे वंचित बहुजन आघाडीने संभाजी भिडेंना अटक करा, यासह मणिपूर घटनेतील संशयित आरोपींना फाशीची शिक्षा द्या ही मागणी घेऊन धरणे आंदोलन केले. दरम्यान सरकारने यावर कारवाई केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT