Washim Jawan News Saam TV
महाराष्ट्र

Washim Jawan News : जवान देवेंद्र वानखडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, बेंबळा गावात हजारोंचा जनसागर

Washim News : जवान देवेंद्र वानखडे यांचे पार्थिव गावात दाखल होतात अनेकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली.

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल

Washim News : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेले जवान देवेंद्र शामराव वानखडे यांना गुरुवारी 27 जुलैला वीरमरण आले. देवेंद्र वानखेडे त्रिपुरा येथे कर्तव्य बजावत होते. त्यांनी 29 वर्ष देश सेवा केली. त्रिपुरा येथे कर्तव्य बजावत असताना अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली आणि तेथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

आज दुपारी त्यांच्या जन्मगावी बेंबळा येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर उसळला होता. उपस्थित प्रत्येकाने जड अंतकरणाने त्यांना निरोप दिला. (Maharashtra News)

जवान देवेंद्र वानखडे यांचे पार्थिव गावात दाखल होतात अनेकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. त्यानंतर हजारोंच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी जवान देवेंद्र वानखडे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. (Latest Marathi News)

बेंबळा येथील स्मशानभूमीजवळ त्यांचा मोठा मुलगा अमित यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांच्या बटालियन व पोलिसांकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

Veen Doghantali Hi Tutena : स्वानंदी-समरमध्ये मैत्री खुलणार; 28 दिवसांत मालिका कोणते नवीन वळण घेणार? पाहा अनोखी लव्हस्टोरी | VIDEO

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

Ajit Pawar Death: विमानात अजितदादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती? खासदाराच्या शंकेने राजकारणात खळबळ

Crime News : नवऱ्याने मोबाईल घेऊन द्यायला नकार दिला, महिलेने मुलासह विहिरीत उडी मारली अन्...

SCROLL FOR NEXT