Nashik Bribe News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; १५ लाखांची लाच घेताना तहसीलदार रंगेहाथ अटक

Nashik Bribe News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; १५ लाखांची लाच घेताना तहसीलदार रंगेहाथ अटक

साम टिव्ही ब्युरो

>> तबरेझ शेख

Nashik Bribe News: नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. येथील तहसीलदारांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आलेय. नाशिक शहरातील त्यांच्या निवासस्थाना जवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत अटक केलीय.

गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी तहसीलदारांनी लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.

नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील एका जमिनीतून मुरूम उत्खननाचे प्रकरण समोर आले होते. त्याबाबत नियमानुसार पाचपट दंड आणि जागा मालकास जागा भाडे असे मिळून एकूण १ कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपये इतका दंड ठोठवण्यात आला होता. (Latest Marathi News)

मात्र या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चौकशीसाठी तहसीलदारांकडे पाठवण्यात आले होते. याबाबत जागेची पडताळणी करण्यासाठी तहसीलदारांनी बहिरम हे राजुर बाहुला येथील तक्रारदारांच्या जमिनीवर गेले.त्या ठिकाणी त्यांनी याप्रकरणी तडजोड करण्यासाठी आणि दंडाची रक्कम कमी करण्यासाठी १५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आला.

त्या ठिकाणी त्यांनी याप्रकरणी तडजोड करण्यासाठी आणि दंडाची रक्कम कमी करण्यासाठी १५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT