Gopichand Padalkar  saam tv
महाराष्ट्र

Gopichand Padalkar : 'धर्मांतरासाठी आलं तर ठोकून काढा, सैराट करणाऱ्यास 11 लाख'; ऋतुजा प्रकरणावर गोपीचंद पडळकर आक्रमक

Gopichand Padalkar News : ऋतुजा राजगे प्रकरणावर गोपीचंद पडळकर आक्रमक भूमिका घेतली आहे. धर्मांतर करायला कोणी आलं तर त्यांना ठोकून काढण्याचं आवाहन पडळकर यांनी केलं आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगलीत धर्मांतराला कंटाळून ऋतुजा राजगे यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरानंतर धर्मांतर विरोधी कायदा तातडीने आमला आणावा, अशी लोकांकडून केली जात आहे. ऋतुजाच्या आत्महत्यनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. धर्मांतरासाठी कोणी आलं तर ठोकून काढा,असं भाष्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

सांगलीच्या गुंडेवाडी येथील सात महिन्याची गर्भवती असणारी ऋतुजा राजगे हिने ख्रिश्चन धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. त्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या सांगता सभेमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. तसेच यापुढे धर्मांतरण खपवून घेतलं जाणार नाही,असा इशारा दिला.

'धर्मांतरण करण्यासाठी गावागावात येणाऱ्यांना यापुढे ठोकून काढा. ठोकणाऱ्यांना यापुढे बैलगाडी शर्यतीप्रमाणे दोन लाख, तीन लाख,पाच लाख रुपये आणि सैराट करणाऱ्यांना अकरा लाखाचं बक्षीस द्या, असं पडळकर म्हणाले.

काय आहे प्रकरण?

ऋतुजाचं २०२१ साली सुकुमार राजगे याच्याशी लग्न झालं. लग्नाआधी ऋतुजा ही हिंदू धनगर होती. परंतु लग्नानंतर धर्मांतर करण्याठी तिच्यावर दबाव होता, असा आरोप मृत ऋतुजाच्या आई-वडिलांनी केलाय. देवाच्या पाया पडायचं नाही, असा उल्लेख पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आहे. ऋतुजा राजगे ही ७ महिन्यांची गरोदर होती. ऋतुजाने गरोदर असताना तिने टोकाचे पाऊल उचललं. त्यानंतर पोलिसांनी राजगे कुटुंबाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुपवाड पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT