Rushikesh Bedre Saam Tv
महाराष्ट्र

Rushikesh Bedre : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण; मुख्य आरोपी ऋषिकेश बेंद्रे यांना जामीन मंजूर

Antarvali Sarati : अंतरवाली सराटे येथील हिंसाचार प्रकरणामध्ये बीडच्या गेवराई येथील ऋषिकेश बेद्रे यांच्यासह अन्य तीन जणांना अंबड पोलिसांनी अटक केली होती. दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ऋषिकेश बेंद्रे यांच्याजवळ गावठी पिस्तूलसह जिवंत काडतूस आढळून आलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Bharat Jadhav

(लक्ष्मण साळुंखे)

Antarwali Sarate stone pelting case Accused Rushikesh Bedre:

अंतरवाली सराटी गावात झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेंद्र यांना जामीन मिळालाय. अंबड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने २५ हजाराच्या व्यक्तिगत जात मुचलक्यावर बेंद्रे यांना जमीन मंजूर केला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंतरवाली सराटीतील आंदोलनादरम्यान लाठीचार्जनंतर दगडफेक झाली होती. याप्रकरणात ऋषिकेश बेदरेला मुख्य आरोपी ठरवण्यात आलं होतं. (Latest News)

अंतरवाली सराटी येथील हिंसाचार प्रकरणामध्ये बीडच्या गेवराई येथील ऋषिकेश बेद्रे यांच्यासह अन्य तीन जणांना अंबड पोलिसांनी अटक केली होती. दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ऋषिकेश बेंद्रे यांच्याजवळ गावठी पिस्तूलसह जिवंत काडतूस आढळून आलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी ऋषिकेश बेंद्रे यांच्याविरोधात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. ऋषिकेश बेंद्रे यांच्या वकिलामार्फत आज अंबड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. यावर आज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावणी करत ऋषिकेश बेंद्रे यांना जमीन मंजूर केला.

यापूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने बेंद्रे यांना अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात जमीन मंजूर केला होता. त्यांना तीन महिन्यासाठी जालना आणि बीड जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आलीय. बेंद्रे यांना जमीन मंजूर झाल्याने मराठा समाजातून आनंद व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान ऋषिकेश बेद्रे यांना बीड आणि जालना जिल्ह्यात पुढील ९० दिवस प्रवेशबंदी करण्यात आलीय.

जर बेंद्रे यांना बीड किंवा जालना जिल्ह्यातील एखाद्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायचा असेल, तर पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊनच त्यांना यावे लागणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली होती. या संपूर्ण वादग्रस्त प्रकार १ सप्टेंबर २०२३ रोजी घडला होता. याप्रकणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेद्रे यांना पोलिसांनी अटक केली होती.

बेद्रे यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप असून ते मराठा आंदोलनामध्ये सक्रिय होते. १ सप्टेंबरच्या दुपारी अंतरवाली सराटी गावात पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला होता. या संघर्षाचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

50 हजार दे नाहीतर दुकान पेटवून देईन, कायद्याच्या बालेकिल्ल्यात पुन्हा गावगुंडांचा उच्छाद|VIDEO

Maharashtra Live News Update : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपमध्ये घराणेशाही; एकाच कुटुंबातील तिघांना उमेदवारी

Masti 4 vs 120 Bahadur Collection : काटे की टक्कर! रितेश देशमुख की फरहान अख्तर पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

Girija Oak Godbole: नॅशनल क्रश गिरिजाचं बीचवर फोटोशूट, PHOTOS पाहा

Why Women Feel Colder : पुरुषांपेक्षा महिलांना जास्त थंडी का वाजते? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT