Sassoon Hospital Shocking Incident Saam Digital
महाराष्ट्र

Sassoon Hospital Shocking Incident: 'ससून'मधून आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नचर चुकवून सुरू होता भयंकर प्रकार

Sassoon Hospital Shocking News: पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील प्रकरण ताजे असतानाच ससून मधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयातील शिक्के चोरीला गेल्यामुळे खळबळ माजली आहे.

Sandeep Gawade

Sassoon Hospital Shocking Incident

पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील प्रकरण ताजे असतानाच ससून मधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयातील शिक्के चोरीला गेल्यामुळे खळबळ माजली आहे. आरोपींनी शिक्के चोरून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केल्याची माहिती उघड झाली असून या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रकाश पांडुरंग मोंडकर आणि सत्पाल पवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांनी १४ डिसेंबर रोजी ससूनमधील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नजर चुकवून शिक्के चोरी केले होते. त्याआधारे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले. ही बाब समोर आल्यानंतर डॉ. दामशेट्टी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नेमके हे बनावट प्रमाणपत्र या आरोपींनी कोणाला वाटली आहेत आणि त्यातून किती रक्कम कमावली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

SCROLL FOR NEXT