Bhausaheb Andhalkar joins Shinde group  Saam TV
महाराष्ट्र

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कट्टर समर्थकांसह कार्यकर्ते शिंदे गटात सामील

शिंदे गटाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देणे सुरूच आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सोलापूर : शिंदे गटाकडून (Eknath Shinde) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला (Shivsena) धक्क्यावर धक्के देणे सुरूच आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक पदाधिकारी आणि नेते शिंदे गटात सामील होत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का दिला आहे.

बार्शी तालुक्यातील शिवसेनेचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब आंधळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर भाऊसाहेब आंधळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

भाऊसाहेब आंधळकर यांनी 2014 साली शिवसेनेकडून बार्शी विधानसभा निवडणूक लढवली होती. बार्शी विधानसभा मतदारसंघात त्यांचा चांगलाच दरारा आहे. पक्षासोबत एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांनी अचानक शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT