संतापजनक! पंढरपूरात दलित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार Saam Tv
महाराष्ट्र

संतापजनक! पंढरपूरात दलित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलगी सरकारी दवाखान्यात जात असताना या तीन नराधमांनी त्या अल्पवयीन मुलीला बाजूला असलेल्या एका आडोशाला नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले.

भारत नागणे

पंढरपूर: पंढरपूर जवळच्या उघडेवाडीत दलित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी तीन नराधमांना पोलिसांनी अटक केली असून पीडितीच्या आईने वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Annoying! Sexual abuse of a Dalit minor girl in Pandharpur)

हे देखील पहा -

अकलूज जवळच्या वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील उघडेवाडी गावात एका दलित अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलगी सरकारी दवाखान्यात जात असताना या तीन नराधमांनी त्या अल्पवयीन मुलीला बाजूला असलेल्या एका आडोशाला नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडितीच्या आईने वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी युवराज गोडसे, रणजीत कोळेकर व एका अनोळखी तरुण विरोधात सहलैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत संबंधित आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तीन आरोपींना पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT