Kalvakuntla Chandrashekar Rao, annabhau sathe jayanti, sangli news saam tv
महाराष्ट्र

K Chandrasekhar Rao : अण्णा भाऊ साठेंचा देशात उचित गाैरव झाला नाही : मुख्यमंत्र्यांची खंत (पाहा व्हिडिओ)

annabhau sathe jayanti : तेलंगणा मुख्यमंत्र्यांचा साठे कुटुंबीयांना सन्मान केला.

विजय पाटील

Sangli News : देशाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे कळले नाहीत असे मत व्यक्त करत अण्णाभाऊ साठे यांना "भारत रत्न"पुरस्कार द्यावा अशी मागणी तेलंगणाच्या मुख्यमंत्री केसीआर (Telangana CM KCR) यांनी सांगली जिल्ह्यात केली. ते सांगलीच्या वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आयोजिलेल्या सभेत बोलत होते. (Maharashtra News)

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे आज अण्णा भाऊ यांच्या जन्मगावी वाटेगाव येथे आले. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करुन अभिवादन केले. तसेच अण्णा भाऊ साठे यांचे घर आणि शिल्पसृष्टी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन साठे कुटुंबीयांशी चर्चा केली.

त्यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (Kalvakuntla Chandrashekar Rao) यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्याबाबत केंद्र सरकारवर टीका करताना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे रशियाला कळले. मात्र आपल्या भारताला कळले नाही अशी खंत व्यक्त केली. गाेरगरीब वंचितांसाठी निर्माण केलेलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य देशातल्या अन्य भाषांत भाषांतर करून देशासह जगापर्यंत पोहोचवलं पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

याबाबत महाराष्ट्र सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीका करत लोकशाहीर अण्णा भाऊ साठेयांचा खऱ्या अर्थाने गौरव करायचा असेल तर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे आणि केंद्र सरकारकडे आपली मागणी असणार आहे.

यासाठी भारत राष्ट्र समिती तेलंगणा मधून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील पाठवेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र सरकारने देखील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या बाबतीत शिफारस पत्र केंद्र सरकारला पाठवायला हवं अशी अपेक्षा मुख्यमंत्री राव यांनी यावेळी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT