Big Breaking : वाईन विक्रिच्या निर्णयाविरोधातील उपोषणातून अण्णा हजारेंची माघार 
महाराष्ट्र

Big Breaking : वाईन विक्रिच्या निर्णयाविरोधातील उपोषणातून अण्णा हजारेंची माघार

ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे ( Anna Hazare) यांचे उद्या होणारे, वाईन विक्रिच्या निर्णयाविरोधातील उपोषण मागे घेण्यात आले आहे.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर : ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे ( Anna Hazare) यांचे उद्या होणारे उपोषण मागे घेण्यात आले आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत त्यांनी आंदोलन करु नये असा निर्णय ग्राममसभेत एकमुखाने घेण्यात आला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण करावं की नाही यासाठी राळेगणसिद्धी (Raleganasiddhi) येथे विशेष ग्रामसभेचे (Gram Sabha) आयोजन आज करण्यात करण्यात आले होते. या ग्रामसभेत सरकारने विक्री सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्री करावी की नाही? आणि अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसावं की नाही याबाबत ठराव मांडण्यासाठी ग्रामसभा झाली. या ठरावात सरकारने याबाबत घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि अण्णा हजारे यांनी उपोषण करू नये; असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने आंदोलन करु नये असा ठराव मंजूर केल्याने राज्य सरकारने घतेलेल्या किराणा दुकानात वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात उद्यापासून करण्यात येणार असलेले उपोषण आपण करणार नसल्याचं अण्णा हजारे यांनी जाहीर केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ रेल्वे स्थानकात रोटरी क्लबतर्फे २ हजार कापडी पिशव्यांचे वाटप

Political News : शिवसेना आमदाराच्या मुलाची रवानगी पोलीस कोठडीत; पाहा कोर्टात नेमकं काय घडलं?

Pune Fort : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला! ४,६०३ फूट उंचीवर दिमाखात उभे आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Ladki Bahin Yojana : गणेशोत्सवात लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट; 'या' दिवशी खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

SCROLL FOR NEXT