Anna Hazare On Shikhar Bank Scam 
महाराष्ट्र

Anna Hazare: शिखर घोटाळा क्लीन चीटबाबत बोलले, मला काहीच माहीत नाही! मला मोठा धक्काच बसला! असं काय घडलं?

Anna Hazare On Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल केल्याचं वृत्त माध्यमात आले होते. त्यावर अण्णा हजारे यांनी यू टर्न घेतलाय.

Bharat Jadhav

सुशील थोरात, साम प्रतिनिधी

शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. यावर अण्णा हजारे यांनी स्पष्टीकरण करत मोठा गौप्यस्फोट केलाय. आक्षेप याचिका दाखल केल्याच्या वृत्तावरच अण्णा हजारेंनी आक्षेप घेतलाय.

याप्रकरणी माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणालेत. ते राळेगण सिद्धी येथे बोलत होते. शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल करण्यासंदर्भात वेळ घेतला अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या.

मात्र या संदर्भात माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करून काही लोक स्वार्थ साधत असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय. मी कधी बोलत नाही बोललो नाही मात्र माझं नाव आलं मला धक्का बसला असं अण्णांनी म्हटलंय. तसेच १५ वर्षांपूर्वी मी आवाज उठवला होता, मात्र आता कुठलाही संबंध नाही. तर अजित पवारांना दिलेली क्लीन चीटसंदर्भात ज्यांना माहिती आहे ते बोलतील. यात माझा कुठलाही संबंध नाही अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली आहे.

दरम्यान, शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल केल्याचे वृत्त माध्यमांत आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. अजित पवारांना लक्ष्य केलं जात असल्याचं काहींनी म्हटलं. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांनाच लक्ष्य केलं होतं. मात्र, अण्णांनी क्लोजर रिपोर्ट याचिकांसदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT