Anna Hazare । अण्णा हजारे  SaamTvnews
महाराष्ट्र

अण्णांची प्रकृती ठणठणीत; राळेगणकडे रवाना

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काल नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते. काल सर्व मुख्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. उर्वरित तपासण्या आज सकाळी करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगीतले आहे.

हे देखील पहा :

नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने काही वेळापूर्वी डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार अण्णा राळेगणकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, अण्णा रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. अण्णांच्या सोबत स्वयंसेवक श्यामकुमार पठाडे व संदीप पठारे आहेत.

अण्णांना रुग्णालयातून निरोप देण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकची संपूर्ण टिम उपस्थित होती. डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मखळे, डॉ. मुनोत यांनी अण्णांच्या सर्व तपासण्या केल्या. काही दिवस अण्णांनी संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्याने किमान एक आठवडा कार्यकर्त्यांनी अण्णांना भेटण्याचा आग्रह धरू नये.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

SCROLL FOR NEXT