Chagan Bhujbal-Anjali Damania
Chagan Bhujbal-Anjali Damania Saam TV
महाराष्ट्र

Anjali Damania: अंजली दमानिया यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; भुजबळांविरोधात करणार होत्या मोठा खुलासा

Ruchika Jadhav

संजय गडदे

Anjali Damania News:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे जालनामधील भाषण हे अत्यंत वादग्रस्त ठरले. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अनेक विधाने केली. मी कोणाच्या कष्टाचे खात नाही तर मी स्वतःच्या कष्टाचेच खातो असे भुजबळ यांनी म्हटल्यानंतर अंजली दमानिया यांनी एक ट्वीट करत भुजबळांबाबत एक मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"कुणाच्या कष्टाचे खात आहेत भुजबळ ? आपल्या ट्वीटमध्ये असा प्रश्न लिहित त्यांनी भूजबळांच्या घरासमोर येऊन खुलासा करणार." असे जाहीर केले होते. मात्र तत्पूर्वीच मुंबई सांताक्रुज पोलिसांनी मंत्री छगन भुजबळ यांचे घर असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात केला. तसेच अंजली दमानिया यांना छगन भुजबळांच्या घरासमोर पोहोचण्याअगोदरच ताब्यात घेऊन जुहू पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज चरंगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला असतानाच आता आरक्षण बचाव आणि ओबीसींच्या हक्कासाठी सर्वपक्षीय ओबीसी नेते मैदानात उतरलेत.

असे असताना काल छगन भुजबळ यांनी जालना येथील सभेत आक्रमक भाषण करत जरंगे पाटील यांच्यावर टीका केली होती. यावेळी बोलताना मी कुणाच्या कष्टाचे खात नाही स्वतःच्याच कष्टाचे खातो. मी दोन वर्ष तुरुंगात जाऊन आलो आहे मी बेसन आणि भाकरी मिरचीचा ठेचा आणि कांदा खाऊन दिवस काढले आहेत. हा मात्र त्यांच्या या वक्तव्यावर अंजली दमानिया यांनी आश्चर्य व्यक्त करत ट्वीट केलं आहे.

अंजली दमानिया या सकाळी साडेअकरा वाजता मुंबईच्या सांताक्रुज पश्चिमेकडील मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाजवळ आल्यानंतर सांताक्रुज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांना माध्यमांशी बोलण्यास देखील मनाई केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT