Anil Parab ED Case
Anil Parab ED Case saam tv
महाराष्ट्र

Dapoli Resort News: दापोली रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना दिलासा, 28 मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन गाड

Dapoli Resort Case : दापोली रिसॉर्ट प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांना उच्च न्यायालयाने दिलासा कायम ठेवला आहे. ईडीच्या प्रकरणात 28 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी सुनावणीसाठी नियमित कोर्ट आजही कामकाजासाठी उपलब्ध नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल परब यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची मुदत मुंबई उच्च न्यायालयाने 28 मार्चपर्यंत वाढवून दिली आहे. यामुळे परब यांना दिलासा मिळाला आहे. माजी राज्यमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील एका रिसॉर्टशी संबंधित ईडीचा खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या प्रकरणात अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे अशी विनंतीही त्यांनी केली होती. त्यानंतर कोर्टाने 23 मार्चपर्यंत त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारावाई करू नये असे निर्देश ईडीला दिले होते. आता ही मुदत 28 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने १३ मार्च रोजी या याचिकेवरील सुनावणी २० मार्च रोजी ठेवली होती आणि ईडीतर्फे उपस्थित अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी दिलेले तोपर्यंत कारवाई न करण्याचे तोंडी आश्वासन स्विकारले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar News | अजित पवारच नाटकं करतात, रोहित पवारांचा घणाघात

T-20 World Cup 2024: विराट,रोहितसह हे स्टार खेळाडू खेळणार आपला शेवटचा टी -२० वर्ल्डकप

CM Shinde: काँग्रेसकडून शहिदांचा अपमान; जनता वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा बदला घेईल: एकनाथ शिंदे

Fungal Infection: वेळीच व्हा सावधान 'या' कारणामुळे होऊ शकतो फंगल इन्फेक्शनचा भयंकर त्रास

Benifits of Chia Seeds: चिया सिड्सचे सेवन महिलांसाठी ठरते अत्यंत फायदेशीर

SCROLL FOR NEXT