Anil Deshmukh Book Saam TV
महाराष्ट्र

Anil Deshmukh Book : 'डायरी ऑफ ए होम मिनिस्टर'मुळे नवा वाद; प्रकाशनापूर्वीच अनिल देशमुखांच्या आत्मकथेने खळबळ

Anil Deshmukh Book Pages Viral : देशमुख यांनी २०२१ सालच्या दिवाळीच्या दिवशी ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांची अटक कशी झाली, याचा उल्लेख केला आहे.

Ruchika Jadhav

सुनिल काळे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपली नवी पुस्तक 'डायरी ऑफ ए होम मिनिस्टर' लवकरच प्रकाशित करणार आहेत. या पुस्तकाचे हिंदी, मराठी आणि इंग्रजी आवृत्तीचे कव्हर पेज समोर आले आहे. अशात आता या पुस्तकातील काही पाने हाती लागली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही २० प्रकरणांपैकी एका प्रकरणात, अनिल देशमुख यांनी एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने केंद्रीय यंत्रणा ईडीविरुद्ध गंभीर आरोप लावले आहेत. या प्रकरणाचे नाव आहे : "ईडी - वरून प्रेशर आहे," ज्यात देशमुख यांनी २०२१ सालच्या दिवाळीच्या दिवशी ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांची अटक कशी झाली, याचा उल्लेख केला आहे.

देशमुख यांच्या या पुस्तकात त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळातील काही महत्त्वाच्या घटनांचा उलगडा होऊ शकतो, जसे की मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवणे, मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्याशी संबंधित माहिती याच असू शकते.

देशमुख यांच्या या पुस्तकामुळे नवीन वाद निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर पुस्तकाच्या प्रकाशनाची वेळही चर्चेचा विषय बनली आहे. माध्यमांवर सध्या या पुस्काचं कवर पेज समोर आलं आहे. राजकीय षडयंत्र उलथवून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा अशी टॅगलाईन यावर लिहिण्यात आली आहे.

केंद्रीय यंत्रणेचा वापर करत विरोधकांना निस्तनाबुध करण्याची नवीन संस्कृती महाराष्ट्रात जन्माला आली. आशा पध्दतीनं हे कवर पेज सजवलं आहे. त्यामुळे या पुस्तकातून कोणत्या गोष्टींचे खुलासे होणार हे पहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

SCROLL FOR NEXT