andolan for good road in akola saam tv
महाराष्ट्र

Akola News : श्री क्षेत्र शेगाव दिंडी मार्गाचे काम संथगतीने सुरु, पारसमध्ये युवकांचे आंदाेलन

शासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे की काय असा सवाल आराेप शेतकरी करु लागलेत.

Siddharth Latkar

- हर्षदा साेनाने

Akola News :

गेल्या सात वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या अकोला निमकर्दा पारस शेगाव या दिंडी मार्गाच्या कामाचा या परिसरातील त्रस्त नागरिकांनी आठवा वाढदिवस साजरा करून एक आगळे वेगळे आंदोलन केले. सरस्वती विद्यालय पारस येथील अत्यंत दुरावस्थेत असलेल्या ठिकाणी हे आंदाेलन छेडण्यात आले. (Maharashtra News)

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या शेगाव नगरीला जोडणारा अकोला ते शेगाव हा मार्ग (akola to shegoan road) भक्तांच्या गर्दीने नेहमी गजबजलेला असतो. याच मार्गावरून दरवर्षी हजारो पायदळ वारकरी व पायदळ दिंड्या शेगाव येथे जात असतात.

अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातील पायदळ वारकरी अकोल्यावरून गायगाव निमकर्दा मार्गे शेगावला दर शनिवारी रात्री व एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी जात असतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या वारकऱ्यांना धुळीचा प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे. एचएम प्रोजेक्ट अंतर्गत या रस्त्याचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. अर्धवट कामामुळे या मार्गावर बरेच छोटे मोठे अपघात झालेत परंतु तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे लावून गुपचूप निद्रावस्थेत आहे. कदाचित शासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा असल्याचे यातून दिसून येते असा आराेप शेतकरी करु लागलेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT