Andhra Pradesh Saam TV
महाराष्ट्र

Andhra Pradesh: धक्कादायक! १२ वी परीक्षांचे निकाल लागताच...; ९ विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन

Ruchika Jadhav

Andhra Pradesh Board Exam Results : बोर्डाची परीक्षेत पास होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी मोठी मेहनत घेत असतो. वर्षभराचा अभ्यास करुन त्यात आपल्याला यश मिळाले की नाही हे एका क्षणात जाहीर केले जाते. यात अनेक विद्यार्थी घवघवीत मार्कांनी यशाला गवसणी घालतात. तर काहींना यात अपयशाचा सामना करावा लागतो. नापास झालेले विद्यार्थी पूर्णत: खचून जातात. आंध्र प्रदेशमध्ये अशीच एक दुर्घटना घडली आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तब्बल ९ मुलांनी आपलं जीवन संपवलं आहे. (Board Exam Results)

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल देण्यात आलेत. निकाल हाती येताच नापास झालेल्या नऊ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निकालाच्या पुढील ४८ तासांतच शालेय विद्यार्थ्यांनी नापास झाल्याने अपमानीत वाटत असल्याने आणि मनात भीती असल्याने स्वत:चे जीवन संपवले आहे.

१० लाख विद्यर्थ्यांनी दिली परीक्षा

यंदा आंध्र प्रदेश बोर्डाच्या परीक्षेला सुमारे १० लाख विद्यार्थी बसले होते. यात ११ वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ६१ टक्के इतकी आहे. तर १२ परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ७२ टक्के इतकी आहे.

श्रीकाकुलम जिल्ह्यातील १७ वर्षीय बी तरुण या विद्यार्थ्याने ट्रेनसमोर उडी घेत आपले जीवन संपवले आहे. तरुण इंटरमिजिएटच्या प्रथम वर्षात शिकत होता. विशाखापट्टणम जिल्ह्यातील आणखीन एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. तो इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्षात नापास झाला होता. विशाखापट्टणम जिल्ह्यातील कांचरापालम भागात देखील १८ वर्षीय एका विद्यार्थ्याने परीक्षेत नापास झाल्याने आत्महत्या केली आहे. सदर घटनांमुळे आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) हादरलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT