Gurudas Baba Amravati, Gurudas Maharaj Amravati, Social Media, Viral Video, Video Viral saam tv
महाराष्ट्र

Chulivarcha Baba Video : चमत्कार सिद्ध करा, तीस लाख मिळवा ! चूलीवरचा बाबा म्हणाला... (पाहा व्हिडिओ)

गेल्या काही दिवसांपासून चूलीवरचे बाबा राज्यभरात चर्चेत आलेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अमर घटारे

Amravati : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एका भोंदू महाराजचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video On Social Media) होत आहे. यामध्ये एक महाराज चक्क तप्त तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देत असल्याचे दिसत आहे. दरम्यान या बाबांना अंनिसने आव्हान दिले आहे. तर साम टीव्ही समाेर येऊन बाबांनी मी अंधश्रद्धा पसरवत नाही. हा श्रद्धेचा भाग आहे, मी साधू संत नाही असा दावा केला आहे. (Breaking Marathi News)

व्हायरल व्हिडिओमधील बाबा हे संत गुरुदास महाराज आहेत. ते तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देताना दिसत आहेत. तसेच शिवीगाळ देखील करताना सुद्धा दिसत आहेत. मार्डी येथे संत गुरुदास महाराज हे गौररक्षणाचे काम करतात. तेथे त्यांचा आश्रम आहे.

गरम तव्यावर बसून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत संत गुरुदास महाराज यांच्याशी साम टीव्हीने संवाद साधला. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. हा व्हिडीओ महाशिवरात्री काऴातील असल्याचा दावा त्यांनी केला.

ते म्हणाले मी कुठलेही अंधश्रद्धेचे काम करत नाही. मला दैवी शक्ती प्राप्त होते. त्यावेळी मला भान नव्हतं. मी अंधश्रद्धा पसरवत नाही, हा श्रद्धेचा भाग आहे. मी साधू संत नाही असा दावा त्यांनी केला.

दरम्यान संबंधित महाराजांचा (chuliwarcha baba) चमत्कार खरा असेल तर त्यांनी तो आमच्या समोर सिद्ध करावा असे आव्हान अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिले आहे. त्याबाबत सचिव हरीश केदार म्हणाले आम्ही त्या महाराजांना 30 लाखाचे बक्षीस देऊ. त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील हरीश केदार यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT