Wahim News Saam TV
महाराष्ट्र

Wahim News:यात्रेला आलेल्या वृध्द भाविकाला सुरक्षा रक्षकाकडून जबर मारहाण

वृध्द भाविकाला जबर मारहण होत असताना तिथे उपस्थित अनेक भाविकांनी मारहाणीची दृश्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Wahim News: आपल्याकडे असलेले पद आणि ताकद यांचा कधीही गैरवापर करु नये असे वारंवार सांगितले जाते. अशा व्यक्तींवर शासन योग्य ती कारवाई देखील करते. मात्र तरी देखील अनेक व्यक्ती आपल्या पदाचा सर्रास गैरवापर करताना दिसतात. अशात मराठवाड्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. यात एका सुरक्षा रक्षकाने यात्रेत आलेल्या भाविकाला जबर मारहाण केली आहे. (Latest Marathi News)

सध्या वाशीम (Washim) जिल्ह्यातील लोणी येथील संत सखाराम यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त मराठवाड्यातील हजारो भाविक यात्रेत सहभागी होत आहेत. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे हे भाविक लोणार सरोवरच्या काठावर असलेल्या धारातीर्थ येथील कुंडात स्नान करतात. त्यामुळे यावेळी देखील भाविक कुंडात स्नान करण्यासाठी गेले होते. मात्र तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून एका भाविकाला जबर मारहाण करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही भाविक कुंडात स्नान करण्यासाठी गेले होते. तेथून बाहेर येताना तिथे सुरक्षा रक्षक उभा होता. त्याचे आणि वृध्द भाविकाचे एका मुद्द्यावरून वाद झाले. त्यामुळे कोणतीही तमा न बाळगता सुरक्षा रक्षकाने भाविकाला मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी अनेकांनी सुरक्षा रक्षकाला मागे खेचून वृध्द (Old-man) भाविकाला त्याच्या तावडीतून सोडवले.

वृध्द भाविकाला जबर मारहण होत असताना तिथे उपस्थित अनेक भाविकांनी मारहाणीची दृश्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. मारहाणीचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Tumor Symptom: हे 1 सायलेंट लक्षण दिसलं तर समजा मेंदूमध्य तयार होतोय ट्यूमर

Maharashtra News Live Update: पुण्यात कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन

Tuesday Horoscope : रोमॅंटिक दिवस जाईल, ५ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

आंध्र प्रदेशातील स्टील प्रकल्पात मोठा स्फोट; ८ मजुरांचा मृत्यू

Driving Licence Validity : ड्रायव्हिंग लायसन्स ५० वर्षे वैध राहणार; वाहन ट्रान्सफरही ऑनलाइन; नियम बदलण्याचा सरकारचा विचार

SCROLL FOR NEXT