Amruta Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO : 'देवेंद्रजींनी नाकर्तेपणावर मारले बाण...', अमृता फडणवीसांचा विरोधकांवर उखाणा घेत निशाणा

Amruta Fadnavis Nagpur News : नागपुरात भारतीय जानता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वान हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते.

प्रविण वाकचौरे

पराग ढोबळे

Nagpur News :

राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या रोखठोक भूमिकेसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. अनेकदा त्या विरोधकांवर निशाणा साधताना दिसतात. मात्र यावेळी त्यांनी उखाण्यातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

नागपूरमध्ये भारतीय जानता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वान हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या. या उपस्थितांनी अमृता फडणवीस यांना उखाणा घेण्याचा आग्रह केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यावेळी अमृता फडणवीस यांनी "देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचे वान, आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण" असा उखाणा घेतला. यावेळी उपस्थितांना टाळ्या वाजवून अमृता फडणवीसांना दाद दिली.

अमृता फडणवीस यांनी यावेळी कार्यक्रमात उपस्थित महिलांशी संवाद देखील साधला. महिलांच्या आग्रहाखातर त्यांनी एक गाणंही गायलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्या महिलांसाठीच्या अनेक योजनांना महिलांना समाजात सन्मानाने उभं राहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab: शिवाली परबचा नवा ग्लॅमरस लूक; सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये कल्याणच्या चुलबुलीचा जलवा

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Bedroom Vastu Tips: बेडरूममध्ये आरसा ठेवावा की नाही? वास्तुशास्त्र काय सांगते?

Fact Check : 5 रुपये नोटेच्या बदल्यात 51 लाख मिळणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

SCROLL FOR NEXT